■ पुरवठा निरीक्षक भरती 2023
महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे एक परिपत्रक 17 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आले आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या दि.04 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षकांची आणि वित्तीय सल्लागार व उप सचिव यांच्या कार्यालयातील उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची रिक्त पदे स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार असून, सदर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी IBPS कंपनीची निवड करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
■ पुरवठा निरीक्षक भरती पात्रता निकष
पुरवठा निरीक्षक भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पुरवठा निरीक्षक पदास आवश्यक असणारी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
■ शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे. परंतु "अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणा-या उमेदवारांना परिक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
■ वयोमर्यादा
शासन नियमाप्रमाणे पुरवठा निरीक्षक भरती 2023 साठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
» खुला प्रवर्ग - 18 ते 40 वर्षे
» मागास प्रवर्ग - 18 ते 45 वर्षे
» उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
■ संगणक अर्हता पात्र प्रमाणपत्र
D.O.E.A.C.C सोसायटीच्या अधिकृत C.C.C तसेच तत्सम स्तर उत्तीर्ण झाल्याचे प्रमाण पत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील अधिकृत MSCIT ची परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नियुक्तीनंतर विहीत मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. नसल्यास महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण- 2000 / प्र. क्र. 61/2001/39 दिनांक 19 मार्च 2003 संगणक अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
■ पुरवठा निरीक्षक भरती परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम
प्राप्त माहितीनुसार पुरवठा निरीक्षक भरती 2023 परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
| अ. क्र | विषय | दर्जा | प्रश्न संख्या | गुण |
|---|---|---|---|---|
| 01 | मराठी भाषा | 12 वी | 25 | 50 |
| 02 | इंग्रजी भाषा | 12 वी | 25 | 50 |
| 03 | सामान्य ज्ञान | पदवी | 25 | 50 |
| 04 | बौद्धिक चाचणी | पदवी | 25 | 50 |
| एकूण | प्रश्न→ | 100 | 200 |
• पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातील
• परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
• परीक्षेचा दर्जा मराठी व इंग्रजी विषयासाठी बारावी आहे तर इतर विषयासाठी पदवी आहे.
• परीक्षेत नकारात्मक 【Negative Marking】 नाही.
• परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
• परीक्षेचा दर्जा मराठी व इंग्रजी विषयासाठी बारावी आहे तर इतर विषयासाठी पदवी आहे.
• परीक्षेत नकारात्मक 【Negative Marking】 नाही.
| विषय :- मराठी भाषा |
|---|
| » सर्वसामान्य शब्दसंग्रह 【समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द,शब्दसमूहाबद्दल एक शब्द » वाक्यरचना 【वाक्र्याचे प्रकार,वाक्यातील त्रुटी शोधणे】 » व्याकरण 【शब्दांच्या जाती, प्रयोग, समास,काळ,अलंकार】 » म्हणी व वाक्प्रचार अर्थ व उपयोग » उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरेमराठी भाषा » सर्वसामान्य शब्दसंग्रह 【समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द,शब्दसमूहाबद्दल एक शब्द » वाक्यरचना 【वाक्र्याचे प्रकार,वाक्यातील त्रुटी शोधणे】 » व्याकरण 【शब्दांच्या जाती, प्रयोग, समास,काळ,अलंकार】 » म्हणी व वाक्प्रचार अर्थ व उपयोग » उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे |
| विषय :- इंग्रजी भाषा |
|---|
» Common Vocabulary 【Synonyms & Antonyms) » Sentence structure 【Types or Sentence , Error Detection】 » Grammar 【Parts of Speech,Subject Verb Agreement Tense,Direct Indirect Speech,Voice】 » Use of Idioms & Phrases their meaning » Comprehension of passage |
| विषय :- सामान्य ज्ञान |
|---|
» इतिहास- आधुनिक भारताचा 【विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास】 » भूगोल 【महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह】 पृथ्वी, जगातील - विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नदया, उदयोगधंदे, इत्यादी. » अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उदयोग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी. तसेचह शासकीय अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी » सामान्य विज्ञान,भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , प्राणीशास्त्र , वनस्पतीशास्त्र , आरोग्यशास्त्र |
| विषय :- अंकगणित व बुद्धिमत्ता |
|---|
| » बुध्दिमापन चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. » अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व - टक्केवारी» बुध्दिमापन चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. » अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व - टक्केवारी |
◆ टीप - वर दिलेले परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!